“ चिमणपाखरं ’’
शाळेतील विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी आम्ही सन २०१४ पासून
सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली.या कार्यक्रमासाठी “ चिमणपाखरं
’’ हे नाव दिले आहे.
भारतीय प्रजासत्ताक दिनाला म्हणजेच २६ जानेवारीला आमच्या शाळेत “ चिमणपाखरं
’’ हा सांस्कृतिक कार्यक्रम मोठया उत्साहात पार पडतो.
या
कार्यक्रमात शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला सहभागी करून घेतले जाते. या
कार्यक्रमासाठी पालकांचे फार मोठे सहकार्य मिळते. शाळेच्या विकास कामांसाठी मोठया
प्रमाणात निधी उपलब्ध होऊ लागला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमधील
कला, नृत्य, अभिनय करणे, सभाधिटपणा या गुणांना प्रोत्साहन मिळून त्यांचा
विकास होतो.
मार्च २०१६ मध्ये खामगाव येथील शिव-शंभो प्रतिष्ठान ने आयोजित केलेल्या कला
महोत्सवात शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.या स्पर्धेत १७० स्पर्धकांनी सहभाग
घेतला होता.आमच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या “ जय घोष चाले तुझा मोरया ’’ या
गीताला प्रथम क्रमांकाचा चषक व ७०००
रुपयांचे बक्षिस मिळाले. तसेच “माळीन एक दुर्घटना” या गीताला तृतीय क्रमांकाचा चषक
व ४००० रुपयांचे बक्षिस मिळाले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा